---Advertisement---
जळगाव : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशन सुरु असतांना सभागृहात शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर लक्ष केंद्रित न करता ऑनलाइन रमी पत्ते खेळत असल्याचा गंभीर आरोप छावा संघटनेने केला आहे.
यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे आणि कार्यकर्त्यांवर कृषिमंत्र्यांच्या समर्थकांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. कृषिमंत्री कोकाटे व त्यांच्या समर्थकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बुलंद छावा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
---Advertisement---
छावा संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध करत कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, तसेच मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. संघटनेने इशारा दिला आहे की जर शासनाने याप्रकरणी कठोर पावले उचलली नाहीत, तर “बुलंद छावा संघटना” आपल्या पद्धतीने न्याय मिळवेल. परिणामी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्यास संपूर्ण जबाबदार सरकार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनांवर प्रदेश उपाध्यक्ष नंदू पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील , नाना महाले, किशोर पाटील , मनोज मोहिते , शुभम अहिरे पाटील , दीपक पाटील , गणेश पाटील, संदीप मांडोळे, महेश बोरसे, आकाश हिवाळे आदींची स्वाक्षरी आहे.