---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : सेवानिवृत्त संघटनेच्या उच्चस्तरीय समितीची बैठक पद्मालय विश्रामगृह येथे आज शनिवारी (२६ जुलै) रोजी पार पडली. या बैठकीत मागील मेळाव्यात ठरल्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या न्यायालयीन लढ्याचे संपूर्ण सूत्र माजी विभागीय लेखा अधिकारी अभय सहजे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश चांगरे हे होते. याप्रसंगी सन 2016 ते 2020 व 2020 ते आज पर्यंतचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दोन गट करण्यात आले. या अंतर्गत वेतन करार, थकबाकी, पेन्शन, 5 टक्के वर्गणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन प्रथम एसटी महामंडळाची चर्चा करावी व त्याच्या नंतरच न्यायालयात जावे असे एकमताने ठरले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मदतीच्या दृष्टिकोनातून आर्थिक लाभास उपयोगी असे फॉर्म तयार करून ते भुसावळ येथे होणाऱ्या महामेळाव्याच्या आयोजनाप्रसंगी वाटप करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अभय सहजे यांनी केले.
---Advertisement---
भुसावळ येथे 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान कोणताही एक दिवस महामेळावासाठी निश्चित करण्यात येणार आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी, जनप्रतिनिधी व मंत्री येणार असल्याने कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली. याप्रसंगी योगराज पाटील, पांडुरंग सोनवणे, विलास अण्णा पाटील, गुलाब शेख, पांडू महाजन, अरुण साळुंखे,आर के पाटील, आर. आर. सपकाळे, नाना घोडेस्वार, अरुण साळुंखे, अभय सहजे आदी उपस्थित होते, गोपाळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर यशवंत फेगडे यांनी आभार मानले.