---Advertisement---

मनपाचे डॉ. विजय घोलप यांना ‘कारणे दाखवा नोटीस’

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : सहकारी डॉक्टर महिलेशी गैरवर्तन करण्याप्रकरणी महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे. तीन दिवसात त्यांना उत्तर मागण्यात आले आहे. जळगाव महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ विजय घोलप यांच्या विरूध्द एका डॉक्टर महिलेने गैरवर्तणूक केल्या प्रकरणी तक्रार दिली होती.

या प्रकरणी आयुक्तांकडून विशाखा समितीकडे हे प्रकरण चौकशीसाठी सोपविण्यात आले होते. विशाखा समितीच्या अध्यक्षा धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समितीतर्फे डॉ. घोलप यांची चौकशी करण्यात आली. मात्र तक्रारदार डॉक्टर महिला अनुपस्थित असल्याने हा अहवाल अद्याप अपूर्ण असल्याचे सागंण्यात आले. रजेवरून आल्यानंतर तक्रारदार महिलेचे म्हणणे घेवून समिती आपला अहवाल आयुक्ताकडे सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.

---Advertisement---

महापालिकेच्या आस्थापना विभागातर्फे वेगळी कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी डॉ. विजय घोलप यांनी ‘शो-कॉज’ नोटीस बजावण्यात आली आहे. यात सहकारी डॉक्टर महिलेशी आपण गैरवर्तन केले आहे. त्या प्रकरणी आपल्याविरूध्द तक्रार असून या प्रकरणी आपण तीन दिवसात आपले म्हणणे सादर करावे असे कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम व महाराष्ट्र मनपा अधिनियमातील कलम ५६ नुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. यात सेवेतून निलंबन तसेच इतर शिक्षाही आहेत.

दरम्यान, गुरुवारी (२४ जुलै) रोजी मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर घोलप यांच्या अनेक तक्रारी करून सुद्धा त्यांच्यावर कार्यवाही होत नसल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी डॉ. घोलप यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली. डॉ. घोलप यांच्या गैरवर्तवणुकीचे अनेक कारणामुळे उघड झाले असून सुद्धा त्यांना बडतर्फ केले नसल्यामुळे शिवसेनेचे कुलभूषण पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आयुक्त ढेरे यांच्यावर संताप व्यक्त केला त्यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर सुद्धा कार्यवाही होत नसल्याने आयुक्तांवर नाराजी व्यक्त करत त्यांना केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment