---Advertisement---

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या दहावी (इ.१०वी) व बारावी (इ.१२वी) पुरवणी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (२९ जुलै) रोजी जाहीर करण्यात आला. जून-जुलै २०२५ या कालावधीत परीक्षा पार पडली होती.

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातून एकूण 746 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 470 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यशाचे प्रमाण 64.82 टक्के इतके आहे. हे निकाल विभागात सर्वाधिक टक्केवारीपैकी एक मानले जात असून, जिल्ह्यातील शाळांमध्ये समाधानकारक वातावरण आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून एकूण 567 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 276 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 49.02 टक्के इतकी आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी बारावीचा निकाल स्थिर असून, विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा चांगला उपयोग करून घेतला आहे.

विद्यार्थ्यांना आपला निकाल खालील संकेतस्थळांवर पाहता येणार आहे:

दहावी निकालासाठी – https://www.mahahsscboard.in, https://sscresult.mkcl.org
बारावी निकालासाठी – https://www.mahahsscboard.in, https://hscresult.mkcl.org

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---