---Advertisement---
---Advertisement---
Amalner Crime : तालुक्यातील एका गावात अज्ञात चोरट्याने बुधवारी (३० जुलै) रोजी एकाच रात्री ४ घरे फोडून सुमारे १५ ते २० ग्रॅम सोने व एक लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले तसेच इतर घरे देखील त्यानी उघडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील चांदणी कुन्हे येथील सुरेश राजाराम पाटील यांच्या घरी अज्ञात चोरट्यानी चोरी केली. त्यांच्या घराच्या मागच्या लोखंडी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला. या चोरट्यांनी घरातल्या कपाटातील साहित्य चोरून नेले. तर अर्जुन गणपत पाटील आणि रवींद्र भिका पाटील यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून त्यांच्याही घरातील सामान अस्ताव्यस्तफेकत चोरी करण्यात आली.
तसेच आणखी एक महिलेच्या घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याठिकाणी काहीच मिळाले नाही. चोरीची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, उदय बोरसे आणि फॉरेन्सिक पथक, श्वान पथक यांना घटनास्थळी पंचनाम्याला पाठवले. प्राथमिक स्वरूपात १५ ते २० ग्रॅम सोने आणि एक लाख रुपये चोरीला गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.