---Advertisement---

शेतकरी त्रस्त : युरियासाठी कृषी केंद्रांवर सकाळपासून लांबच लांब रांग

---Advertisement---

चाळीसगाव  : गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीक  दिल्याने शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या कामांना वेग आला आहे. यात निंदणी, खुरपणी व पिकाला खत देण्याच्या तयारीत आहेत. परंतु, तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे. युरियाच्या खरेदीसाठी सकाळी ६ वाजेपासून शेतकरी कृषी केंद्रांवर रांग लावून धडपड करतानाच चित्र पाहावयास मिळत आहे.

तालुक्यात शेतकरी युरियाच्या खरेदीसाठी तासंतास रांगेत उभा राहत आहे. काही तासांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्याचा कृषी केंद्रावर खरेदीसाठी नंबर आधार कार्ड आपण शेतकऱ्याला दोनच युरिया थैल्या दिल्या जात असल्याने शेतकरी संताप्त झाले आहे.

युरिया खताचा साठा कमी असणे , त्याचे नियोजन योग्य न होणे, साठेबाज  कारवाया यामुळे सामान्य शेतकऱ्यांना दोन थैल्यासाठी ही रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

बी बियाणे, वीज पाणी,  निसर्ग यांचं व्यवस्थापन संस्थाकडून अपयशी ठरतय हे वास्तव आहे . खते मिळत नाही, पाऊस पडत नसल्याने कर्ज वाढते आणि फळाला, धान्याला  भाजीपाल्याला भाव मिळत नाही . या दृष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्याचा मानसिकता खराब होऊ शकते. यासर्व बाबींकडे शासनाने योग्य ते लक्ष देण्याची गरज आहे. तसेच खत साठवणूक करणाऱ्या दलालांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर सुरु उमटत  आहे.  तरी याकडे चाळीसगाव तालुका कृषी अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी विनंती शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे 





Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---