---Advertisement---
जळगाव : श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर आज सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. शहरात विविध भागात, शाळा, महाविद्यालय येथे दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. अशाच प्रकारे विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात देखील हा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
दहीहंडीच्या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष बडगुजर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. हितेश ब्रिजवासी यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम समन्वय आणि सांघिक खेळ भावनेचे प्रदर्शन करीत पहिल्याच प्रत्नात दहीहंडी फोडून चांगली कामगिरी केली.
विद्यार्थ्याच्या या प्रदर्शनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी विद्यार्थ्यांच्या कौतुक करत जन्माष्टमीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भक्ती, प्रेम आणि सामाजिक एकतेचा सण आहे. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांमधून आपल्याला जीवनातील मूल्यांची शिकवण मिळते. दहीहंडी ही त्याच परंपरेचा भाग असून ती तरुणांमध्ये एकजूट आणि सहकार्याची भावना निर्माण करते.” यशस्वितेसाठी संतोष बडगुजर, हितेंद्र सरोदे, प्रदीप सपकाळे यांनी प्रयत्न केले.