---Advertisement---
जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी १७ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री पदाची जबादारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा संघटनात्मक आढावा घेतील.
रविवारी, १७ ऑगस्ट रोजी अजित पवार जळगाव शहरात सुमारे ६ ते ७ तास थांबणार आहेत. यावेळेत ते काही शासकीय कामांसह महत्त्वाच्या राजकीय बैठका आणि मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत खान्देशस्तरीय भव्य समृद्ध खान्देश संकल्प मेळाव्याचे जी. एस. ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले आहे. याच मेळाव्यात काँग्रेसच्या माजी प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे व त्यांचे सहकारी ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करणार आहेत.
तसेच जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील इतर पक्षातील अनेक मान्यवर नेते ही पक्ष प्रवेश करणार आहेत. याप्रसंगी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ, नंदुरबार जिल्हा पालक मंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. माणिकराव कोकाटे, मंत्री तथा खान्देश प्रभारी व वरिष्ठ उपाध्यक्ष आमदार अनिल पाटील , माजी मंत्री नवाब मलिक, जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व मान्यवर नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.