---Advertisement---
जळगाव : ना. अजित पवारांच्या उपस्थितीत जळगावमध्ये आज पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा आहे. मी संपर्क मंत्री असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपरिहार्य आहे. या कार्यक्रमासाठी माझी उपस्थिती आहे दुसरा कुठलाही विषय नसल्याचे स्पष्टीकरण नंदुरबार जिल्हा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात रविवारी (१७ ऑगस्ट)प्रसार माध्यमांशी बोलत होते.
ना. माणिकराव कोकाटे यांनी पुढे सांगितले की, प्रतिभा शिंदे ह्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश सोहळा हा पार पडणार आहे. अतिशय मोठा असा पक्षप्रवेश सोहळा हा होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यात बळ मिळत आहे ती ताकद सत्तेत परावर्तित आम्ही करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपक्ष की युती हा निर्णय पक्ष घेईल.
मंत्री गिरीश महाजन यांनी स्वबळाचे संकेत दिले आहे मात्र त्यांनी त्यांचा पक्षाचा विचार करावा. निवडणुका स्वबळावर किंवा महायुती म्हणून लढवायच्या हा निर्णय आमचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. नेते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल असे संकेत त्यांनी दिले.