‘गिरीशभाऊ’… तुम्हाला भेटायचंय हो…!

---Advertisement---

 

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा समाजाभिमुख कसा असावा, याची जर काही उदाहरणे द्यायची झाल्यास विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव हमखास पुढे येते. विद्यार्थी परिषद चळवळीत काम करत असतांना घडत गेलेले गिरीश महाजन राजकीय प्रवाहात आले. एक धडाडीचे नेतृत्व या क्षेत्रात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उतरले. काही काळ सरपंचपदाची धुरा त्यांनी सांभाळली. कार्यकत्याँसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख झाती आरोग्य सेवेने तर त्यांचे नाव राज्यात झाले… हळूहळू त्यांचा राजकीय आलेख वाढत गेला. याचे कारण विद्यार्थी परिषद चळवळ, संच परिवारातील दिग्गजांचा सहवास यामुळे नेतृत्व कौशल्य आकार घेऊ लागले. जातीची तसेच आर्थिक समिकरणे या सर्वांवर मात करत त्यांनी आमदारकी पटकावली. त्या काळच्या राजकीय दिग्गजांना हा दणका जोरदार होता. ‘सुपारी बाग’ मोठ्या कौशल्याने आडकीत्त्यात आली. हे समजूही दिले नाही… युवाशक्तीचा जागर अन् संघटन कौशल्याच्या जोरावर या गिरीशभाऊ नावाच्या वादळाने त्यानंतर मागे पाहीले नाही. यानंतर केवळ जिल्ह्यापर्यंत मर्यादीत न रहाता अनेक आंदोलने, सामाजिक बांधिलकी कृतिशिलपणे जपत समाजमनात आपल्या कार्याचा वेगळा ठसा या नेतृत्वाने उमटविला. विरोधी पक्षात असताना केलेली धडाकेबाज आंदोलने, संकटमोचक म्हणून राज्यातील प्रश्नांना सामोरे जाणे यामुळे त्यांचे जीवन फुलत गेले. परिणामी पक्षाच्या नेतृत्वानेदेखील त्यांना वेगवेगळ्या व महत्त्वाच्या कामगिरीची वेळोवेळी जबाबदारी दिली.

पण आता… हा ‘आता’… अनेकांना वेदनादायी ठरत असतो. ठिक आहे. गिरीशभाऊ आता जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचे नेतृत्व करतायं. पण ज्या जिल्ह्यात आपण वाढलो… त्याचे काय? कार्यकर्ता खरोखर खुश आहे काय? त्याच्या वेदनेवर फुंकर कोण घालणार? विरोधी पक्षात असताना अनेकांनी सत्ताधाऱ्यांचा मार खाल्ला… त्यांच्यावर केसेस झाल्या… पण आज त्यांचीच परवड होत असत्याच्या वेदना व्यक्त होत असतात. सत्ता असली की गोळा होणारी गर्दी नंतर कुठे गायब होते… याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत व पाहत आहोत… कामे करून घेण्यासाठी गर्दी करणारे संधीसाधु राजकीय क्षेत्रात भरपूर आहेत. दुर्दैवाने त्यांचीच गर्दी आमच्या नेतृत्वाच्या अवतीभोवती दिसते. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघितले जाते? पक्षाच्या विविध पातळ्यांवरील नेतृत्वाने यापूर्वी व आताही सामान्य कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू मानून संघटना वाढविली. त्या परंपरेला कोठेतरी छेद जातोयं असे दुर्दैवाने म्हणावे लागतेयं. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर पडणारी प्रेमाची थाप त्याता शंभर हर्तीचे बळ देणारी ठरते. भाऊ यालाच तो मुकतोयं पक्ष कार्यालयात छोटी-मोठी कामे घेऊन आलेला कार्यकर्ता जेव्हा तुम्ही त्याच्या ‘नमस्कार भाऊ या दोन शब्दांना प्रतिसाद न देता मोबाईलवर बोलत गाडीत बसून निघून जातात… तेव्हा त्याला काय वेदना होत असतील… याचा कोठेतरी विचार व्हावा, असे वाटते. म्हणतात. सत्य हे कटू असते… पण ही वस्तुस्थिती आहे… आपला कार्यकर्ता हा संवेदनशिल आहे… तो राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा आहे… त्या विचाराने तो झपाटलेला असल्यामुळे शांतपणे निघून जातो. ‘भाऊ भेटतच नाही हो…!’ असे बोलणाऱ्यांची संख्या वाढतेयं आणि मग हळूच दबकत.. दबकत जुन्या नेत्यांशी तुलना केली जाते. ते कसे पटकन प्रतिसाद देत असत… अशी भाषा अगदी निष्ठावंताच्या तोंडून ऐकायला मिळते… गिरीशभाऊ साधा फोनही उचलत नाहीत… अशाही तक्रारी एकमेकांशी चर्चेतून उमटतात… कार्यक्रमांना उशिरा जाणे किंवा येतो…. येतो… म्हणत अचानक जाणे टाळणे हे प्रकार कार्यक्रम आयोजकांना वेदनादायी ठरतात… कारण राज्यात नेतृत्व करणारं व्यक्तीमत्व येणार म्हणून या आयोजकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. पण जेव्हा नकार येतो त्यावेळी त्यांची काय अवस्था होत असेल… याचा कोठेतरी विचार होणे गरजेचे वाटतेयं. भाऊ ‘परिस्थिती बदलली की बदलणे’ या गुणधर्माची माणस सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारी माणसं जपली जावीत असे वाटते…।

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---