---Advertisement---
जामनेर : तालुक्यातील चिंचखेडा (तपोवन ) येथील एका २२ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाचे नाव शेखर श्रीराम पाटील वय २२ वर्षे असे आहे. तो बीएससी शिक्षण पूर्ण करून शेती करीत होता आज सकाळी तो शेतात गेला परंतु काही वेळाने त्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच शेखर पाटील याच्या नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. शेखरचा मृतदेह पाहताच त्यांनी तात्काळ पोलिसांना याची खबर दिली. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उप आरोग्य रुग्णालय जामनेर येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येचे नेेमके कारण अद्याप समजू शकले नाही. शेखरच्या कुटुंबात आईवडील आणि विवाहित बहिण असा परिवार असून शेखर हा आभ्यासू व शांत स्वभावाचा म्हणुन त्याचीओळख होती त्याचे मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून जामनेर पोलीस स्टेशन चे पोलीस पथक पुढील तपास करीत आहे









