नफ्याचे आमिष दाखवत अमळनेरच्या डॉक्टरची २७ लाखात फसवणूक

---Advertisement---

 

जळगाव : ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील एका डॉक्टरची तब्बल २७ लाख ९५ हजार ६३० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ. विकास सोमेश्वर पवार यांनी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

अमळनेर येथे कृष्णा डेंटल क्लिनिक चालवणारे डॉ. विकास पवार (वय ४८, रा. मुंदडा नगर-२, अमळनेर) हे फेसबुकवर नियमित सक्रिय असतात. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना अंकिता देसाई नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली, जी त्यांनी स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले.

या महिलेने डॉ. पवारांना ट्रस्ट बुकिंग कस्टमर सर्व्हिस नावाची एक कंपनी असून, त्यात पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले. अंकिता देसाईने व्हॉट्सॲप आणि टेलीग्रामद्वारे डॉ. पवारांशी संपर्क साधला. तिने त्यांना एक लिंक पाठवून त्यावर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले. सुरुवातीला १० हजार रुपये गुंतवून वेबसाईटस आणि हॉटेल्सना ५ स्टार रिव्ह्यू देण्याचा टास्क दिला. प्रत्येक टास्क पूर्ण झाल्यावर भरलेल्या रकमेवर ०.२५ टक्के नफा मिळेल, असे सांगितले. विश्वास संपादन करून मोठी फसवणूक ९ ऑक्टोबर रोजी डॉ. पवारांनी त्यांच्या बँक खात्यातून १० हजार रुपये हस्तांतरित केले. त्यानंतर त्यांना ॲपमध्ये ९०० रुपयांचा नफा दिसला, ज्यामुळे त्यांचा विश्वास बसला. यानंतर वारंवार टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर डॉ. पवारांनी वेळोवेळी एकूण २७ लाख ९५ हजार ६३० रुपये भरले, ॲपमध्ये त्यांना ३६ लाख ८२ हजार २७५ रुपये नफा झाल्याचे दिसत होते.

पैसे काढण्याचा प्रयत्न फसल्याने संशय

जेव्हा डॉ. पवारांनी भरलेली मूळ रक्कम आणि झालेला नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते शक्य झाले नाही. त्यांनी अंकिता देसाईशी संपर्क साधला असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आणखी पैशांची मागणी करू लागली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. पवारांनी २९ ऑक्टोबर रोजी सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---