गोवंश मास विक्री करताना वरणगावात एकास पकडले

---Advertisement---

 

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे सार्वजनिक ठिकाणी गोवंश मास विक्री करताना एका इसमास मुद्देमालासह वरणगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडून कारवाई केल्याची घटना मंगळवारी दहा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गोसेवक ११२ वर फोन करून कपिलवस्तू नगर येथे अवैध प्रकारे गोवंश मास विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता सपोनि अमित कुमार बागुल यांच्या आदेशानुसार सहायक फौजदार श्रावण जवरे, प्रशांत ठाकूर, ईश्वर तायडे, सुकराम सावकारे, मनोज म्हस्के हे या ठिकाणी गेले. एक इसम काहीतरी विक्री करीत असताना दिसला त्यावर पंचासमक्ष अचानक छापा टाकून त्यास पकडले. शेख कलिम शेख अब्दुल रहेमान (वय ५२, रा. प्रतिभानगर, वरणगाव) असे त्याचे नाव आहे.

यावेळी गोरक्षक विनोद सुनील माळी रा. बोहर्डी, ता. भुसावळ, अजय बाबुराव हिंगणे (वय २७, रा. कौलखेड लहरीया नगर, अकोला) हे उपस्थित होते. संशयितांकडून ७५० ग्राम वजनाचे गोवंश जनावराचे मास, एक लोखंडी सुरा, २०० रु. किमतीचा एक वजनकाटा असा २०० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये पोकों ईश्वर तायडे यांच्या फिर्यादीवरून संशयिता शेख कलीम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---