---Advertisement---
जळगाव : शहरात बंद घरांवर डल्ला मारण्याचे चोरट्यांचे सत्र सुरुच आहे. शहरातील देवेंद्रनगरात बंद घराचा कडीकोयंडा तोडुन चोरट्यांनी ४८ हजार रुपये किम तीचे सोन्याचे दागिने घेत पोबारा केला. २६ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीनुसार सोमवारी (८ डिसेंबर) रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मनिषकुमार सिंग (वय ३७, ह.मु. प्लॉट नं.३०/३१ देवेंद्रनगर, मुळ रा. ईस्ट रामकृष्णनगर निअर होली फेअर स्कुल, पो. न्युजगनपुरा पटना, बिहार) हे वास्तव्य करतात. कामानिमित्त ते घराला कुलुप लावुन ते २० नोव्हेंबरला संध्याकाळी बाहेरगावी गेले होते. ते २६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरी आले असता त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. घरात आल्यानंतर त्यांना सामान अस्ताव्यस्त केलेला दिसला. कपाटातील सामान बाहेर फेकलेला होता. दागिने गहाळ झाल्याचे दिसून आले.
२४ हजार किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टोंगल, १८ हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, सहा हजार किमतीची एक ग्रॅम वजनाचे पेन्डल व अंगठ्या असा सुमारे ४८ हजार रुपये किम तीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. या प्रकरणी हवालदार जितेंद्र राजपुत हे तपास करीत आहेत.









