लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांची मोठी घोषणा ; थेट मदतीसाठी हेल्पलाईन जारी…!

---Advertisement---

 

राज्यातील लाखो महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत असून, या योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना गेल्या दीड वर्षांपासून दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात दिले जात आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण होतं.

विशेष म्हणजे, अनेक महिलांनी e-KYC पूर्ण करूनही पैसे न मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काही लाभार्थ्यांकडून e-KYC दरम्यान चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे लाभ थांबवण्यात आल्याचं निदर्शनास आलं. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा करत, लाडक्या बहिणींसाठी विशेष हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

181 या हेल्पलाइन नंबर वर मिळणार थेट मदत :

१ . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित
हप्ता न मिळाल्याच्या तक्रारी
२. e-KYC संदर्भातील अडचणी
३. लाभ स्थगित झाल्याबाबत शंका
४. इतर कोणतेही प्रश्न

या हेल्पलाइन नंबर त्वरित निरसन करण्यात येणार आहे.

आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे की, 181 या महिला हेल्पलाइन नंबरवर प्रशिक्षित कॉल ऑपरेटर्स नियुक्त करण्यात आले असून, लाभार्थ्यांच्या तक्रारींचं योग्य मार्गदर्शन केलं जाणार आहे.  सरकारचा तोडगा दरम्यान, चुकीच्या लाभार्थ्यांची नोंद रोखण्यासाठी राज्य सरकारने लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर पात्र महिलांचा रखडलेला लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे.

आदिती तटकरे यांनी सर्व लाडक्या बहिणींना आवाहन केलं आहे की, गरज भासल्यास 181 हेल्पलाइनवर संपर्क साधावा आणि या सुविधेचा लाभ घ्यावा.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतील अडचणी दूर होण्याची शक्यता असून
लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---