---Advertisement---
“मुंब्रा हरा कर देंगे” या एमआयएमच्या विधानावरून राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली असून, याच मुद्द्यावरून भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना अत्यंत जहरी शब्दांत इशारा दिला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठलं आहे.
मुंबईच्या ठाण्यातील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला इम्तियाज जलील यांनी पाठिंबा देत, “महाराष्ट्र हिरवा करणार” असं वक्तव्य केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं.
यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे आक्रमक झाले असून त्यांनी थेट आव्हान दिलं आहे….
“महाराष्ट्र हिरवा करायचं स्वप्न पाहणाऱ्या हिरव्या सापाला इथेच जमिनीत गाडू,” असा घणाघाती इशारा नितेश राणेंनी दिला आहे.
इतकंच नाही तर इतिहासाची आठवण करून देत त्यांनी जोरदार प्रहार केला. “औरंगजेब आणि टिपू सुलतान यांनीही महाराष्ट्राला हिरवे करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी भगवा फडकवत त्यांना याच मातीत पराभूत केलं,” असं म्हणत राणेंनी इम्तियाज जलीलांवर टीकेची झोड उठवली.
हिंदू राष्ट्रावर ठाम भूमिका यावेळी नितेश राणे यांनी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावरही स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली…. ते म्हणाले
“हे हिंदू राष्ट्र आहे आणि ते कायम भगवेच राहणार आहे. जो कोणी हे बदलण्याचं स्वप्न पाहील, त्याला महाराष्ट्रातील हिंदू गाडल्याशिवाय राहणार नाहीत.” या जहरी वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलं असून, आता एमआयएम यावर काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









