“राऊतांच्या मास्कमागचं सत्य समोर…! संजय राऊतांना नेमका कोणता आजार ? अखेर स्वतःच केला धक्कादायक खुलासा…”

---Advertisement---

 

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत अनेक तर्कवितर्क सुरू होते. कधी चेहऱ्यावर मास्क, तर कधी अचानक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणं…. पण आजपर्यंत आजार नेमका काय, याबाबत स्पष्ट माहिती नव्हती. दिवाळीच्या काळात अचानक राऊत यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून त्यांच्या तब्येतीबाबत चर्चांना उधाण आलं. अनेकांनी विविध आजारांची शक्यता व्यक्त केली, मात्र सत्य लपलेलं होतं.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी स्वतः आपल्या आजाराचा धक्कादायक खुलासा केला. “हो, मला कॅन्सर झाला. दिवाळीच्या आधी त्याचं निदान झालं. तपासणीत पोटात कॅन्सर असल्याचं समोर आलं,” असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.

संजय राऊत म्हणाले…

“मी हार मानलेली नाही. उपचार सुरू आहेत. काही शस्त्रक्रिया अजून व्हायच्या आहेत. पण मी लढतोय. जेव्हा शक्य होईल, तेव्हा उभा राहतोय, बाहेर पडतोय.” आजार समोर आल्यानंतर देशातील अनेक राजकीय नेत्यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी संपर्क साधला.

विशेष म्हणजे गंभीर आजाराशी लढत असतानाही संजय राऊत पुन्हा एकदा सभा, कार्यक्रमांमध्ये दिसू लागले आहेत. त्यांच्या या लढ्याचं राजकीय वर्तुळातच नाही, तर सर्वसामान्यांमध्येही कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---