जळगावात अचानक अवकाळी पावसाची हजेरी; अनेकांची उडाली तारांबळ, शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता….!

---Advertisement---

 

जळगाव शहरात आज अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह परिसरात ढगाळ वातावरण होते आणि आज दुपारनंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या या पावसामुळे जळगावकरांची एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक नागरिकांनी दुकानांच्या आडोशाला धाव घेतली, तर काहींना पावसातच अडकून पडावे लागले. विशेषतः हातमजुरीवर काम करणारे कामगार, फेरीवाले तसेच छोटे उद्योग आणि व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचे दिसून आले.

वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वाहनांची गती मंदावली, तर पावसामुळे बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळाला. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापणीला आलेली पिके, भाजीपाला तसेच इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आधीच हवामानाच्या लहरीपणामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून पुढील काही तासांत ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---