बीपीसीएलकडून राष्ट्रीय पीएनजी व सीएनजी ड्राईव्ह 2.0 ची घोषणा…!

---Advertisement---

 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य ऊर्जा कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने देशभरात पीएनजी आणि सीएनजी ड्राईव्ह 2.0 या राष्ट्रीय स्तरावरील जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीची अधिकृत घोषणा केली आहे. हा उपक्रम भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाशी सुसंगत असून, देशाच्या ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

या उपक्रमांतर्गत पीएनजी ड्राईव्ह 2.0 ची दूरदर्शन जाहिरात मोहीम राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम पीएनजी आरबी उद्योग समिती यांच्या वतीने राबवण्यात येत असून, यामध्ये देशभरातील सर्व शहर वायू वितरण कंपन्यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

या मोहिमेसाठी सादर करण्यात आलेल्या नव्या पीएनजी आणि सीएनजी टीव्ही जाहिरातींमध्ये अभिनेता व खासदार रवि किशन यांनी सीएनजीचा प्रचार केला असून, सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तन्वर यांनी पीएनजी वापराचा संदेश दिला आहे. या जाहिरातींमधून नैसर्गिक वायूची सुरक्षितता, परवडणारी किंमत, वापरण्यातील सोय आणि पर्यावरणपूरक फायदे ठळकपणे अधोरेखित करण्यात आले आहेत.

ही देशव्यापी जनजागृती मोहीम 1 जानेवारी ते 31 मार्च 2026 या कालावधीत राबवली जाणार असून, ती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात पीएनजीचा वापर वाढवणे, तसेच वाहतूक क्षेत्रात सीएनजीचा अधिकाधिक स्वीकार घडवून आणणे हा आहे. यामाध्यमातून स्वच्छ, सुरक्षित आणि विश्वासार्ह ऊर्जा उपलब्धतेला चालना देण्यावर भर देण्यात येत आहे.
यावेळी बीपीसीएलचे विपणन संचालक शुभंकर सेन म्हणाले,

“पीएनजी आणि सीएनजी ड्राईव्ह 2.0 हा उपक्रम राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने तसेच नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नैसर्गिक वायू स्वयंपाकघरापासून ते वाहतुकीपर्यंत सुरक्षितता आणि अखंड पुरवठा सुनिश्चित करत असून, कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट घडवून आणतो.”
‘नॉन-स्टॉप जिंदगी’ या संकल्पनेवर आधारित ही मोहीम नैसर्गिक वायूच्या विविध सोयीसुविधा आणि त्याचे दैनंदिन जीवनातील फायदे प्रभावीपणे मांडते.

या कार्यक्रमाला बीपीसीएलचे व्यवसाय प्रमुख (वायू) राहुल टंडन, महानगर गॅसच्या महाव्यवस्थापक सौ. नीरा अस्थाना फाटे, तसेच बीपीसीएलचे पीआर व ब्रँड प्रमुख रमण मलिक यांनीही आपली मते मांडली.

या उपक्रमाच्या माध्यमातून भारतासाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जा भविष्य घडवण्याचा संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---