सरकारी बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी; CBO पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर…

---Advertisement---

 

सरकारी बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस्ड ऑफिसर अर्थात CBO पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत देशभरात २,२७३ पदे भरली जाणार आहेत.

ही भरती IBPS मार्फत केली जाणार असून, पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली असून १८ फेब्रुवारी २०२७ ही अंतिम मुदत आहे. इच्छुक उमेदवार sbi.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

पात्रतेबाबत बोलायचं झालं तर, मेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच बँकेत किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२५ रोजी २१ ते ३० वर्षे अशी आहे.
मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमांनुसार सूट देण्यात येणार आहे.
SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची सूट मिळणार आहे.

अर्ज शुल्काबाबत माहिती अशी —
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी शुल्क ७५० रुपये आहे.
तर SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

पगाराबाबत सांगायचं झालं तर,
निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० रुपयांपासून ते ८५,९२० रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे.
प्रारंभिक बेसिक सॅलरी ४८,४८० रुपये असेल.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर उपलब्ध SBI CBO भरती २०२६ या लिंकवर क्लिक करा.
नवीन नोंदणी करून आवश्यक माहिती भरा.
त्यानंतर अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
भविष्यासाठी अर्जाचा प्रिंटआउट जतन करून ठेवा.

सरकारी बँकेत स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे.
पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करावा, असं आवाहन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---