”कुबड्यांची गरज नाही”, गिरीश महाजनांच्या वक्तव्याने मित्रपक्षांमध्ये तणाव…

---Advertisement---

 

Girish Mahajan : नाशिक महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या ”भाजपला कुबड्यांची गरज नाही” या वक्तव्यामुळे शिंदेसेनेत तीव्र असंतोष निर्माण झाला असून, या प्रकरणी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भूमिका मांडण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांनी घेतल्याचे उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले.

नाशिक महापालिकेची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवली असली, तरी सत्तास्थापनेसाठी समन्वय साधण्याच्या दृष्टीने भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला (अजित पवार गट)यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता.

मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी ”भाजपला कुबड्यांची गरज नाही” असे वक्तव्य करत नाराजी व्यक्त केल्याने संपूर्ण राजकीय समीकरण बदलले. या वक्तव्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा असल्याचे सांगत, भाजपकडून सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव आल्याचे स्पष्ट केले.

शिंदे साहेब जो आदेश देतील तो मान्य – शिवसेना
या घडामोडीनंतर शिंदे गटातील नेत्यांनी एकत्रित भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. ”शिंदे साहेब जो आदेश देतील तो आम्ही मान्य करणार, विरोधी बाकावर बसायला सांगितले तरी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू”, असे शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजप- शिंदेसेना संबंध पुढे कोणत्या दिशेने जातील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.v

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---