शिवजयंतीनिमित्त जळगावात जल्लोष, उंट-घोडे आणि आदिवासी नृत्याचा देखावा

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध भागांतून निघालेल्या या मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मिरवणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मिरवणुकीत आकर्षक देखावे, उंट-घोड्यांची शान आणि पारंपारिक आदिवासी नृत्यांनी विशेष लक्ष वेधले. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. युवक-युवतींसह लहान मुलांचाही मोठा सहभाग दिसून आला.
मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे करण्यात आली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---