Horoscope 27 February 2026 : 27 फेब्रुवारीला ‘या’ राशींना बसणार मोठा धक्का; ग्रहांची मोठी हालचाल….! काही राशींवर भाग्याचा वर्षाव की संकटाची साथ, जाणून घ्या राशिभविष्य….

---Advertisement---

 

Horoscope 27 February 2026 : 27 फेब्रुवारी 2026 हा दिवस अनेक राशींसाठी अनपेक्षित घडामोडी घेऊन येऊ शकतो. काहींसाठी करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे, तर काहींनी आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहस्थिती सूचित करते की संयम आणि योग्य निर्णय घेतल्यास दिवस फायदेशीर ठरू शकतो. जाणून घ्या तुमच्या राशीनुसार काय आहे खास….

मेष राशी: 
मेष राशींच्या लोकांसाठी आज तुमच्यात प्रचंड ऊर्जा असेल, पण ती योग्य दिशेने वापरणे महत्त्वाचे आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. व्यवसायिकांनी जोखीम घेताना विचारपूर्वक पावले उचलावीत. जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांत संवाद साधा.
आर्थिक स्थिती: मध्यम, खर्चावर नियंत्रण आवश्यक.
आरोग्य: डोकेदुखी किंवा थकवा.
उपाय: सकाळी सूर्याला अर्घ्य द्या.
शुभ रंग: लाल
शुभ अंक: ९

वृषभ राशी: 
वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस स्थैर्य देणारा आहे. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम वेळ. व्यवसायात छोटा पण समाधानकारक नफा होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते.
आर्थिक स्थिती: बचत वाढवण्याचा प्रयत्न करा.
आरोग्य: पचनसंस्थेची काळजी घ्या.
उपाय: लक्ष्मीदेवीसमोर तूपाचा दिवा लावा.
शुभ रंग: पांढरा
शुभ अंक: ६

मिथुन राशी :
मिथुन राशींच्या लोकांसाठी नवीन संपर्क आणि संवाद तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. ऑफिसमध्ये टीमवर्कमुळे यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होईल. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील.
आर्थिक स्थिती: छोटा आर्थिक लाभ संभवतो.
आरोग्य: मानसिक ताण टाळा.
उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करा.
शुभ रंग: हिरवा
शुभ अंक: ५

कर्क राशी : 
कर्क राशींच्या लोकांसाठी घरगुती वातावरण शांत आणि समाधानकारक राहील. कुटुंबातील एखादा प्रश्न मार्गी लागेल. नोकरीत संयम बाळगल्यास फायदा होईल. भावनिक निर्णय घेणे टाळा.
आर्थिक स्थिती: स्थिर.
आरोग्य: सर्दी-खोकल्याची शक्यता.
उपाय: शिवलिंगावर पाणी अर्पण करा.
शुभ रंग: क्रीम
शुभ अंक: २

सिंह राशी :
सिंह राशींचे लोकं आज तुम्ही केंद्रस्थानी राहाल. तुमचे नेतृत्वगुण सर्वांना प्रभावित करतील. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात मान-सन्मान मिळेल.
आर्थिक स्थिती: नफा वाढण्याची शक्यता.
आरोग्य: उष्णतेपासून सावध राहा.
उपाय: सूर्य मंत्र जपा.
शुभ रंग: सोनेरी
शुभ अंक: १

कन्या राशी : 
कन्या राशींच्या लोकांनी नियोजनबद्ध काम केल्यास यश निश्चित आहे. ऑफिसमध्ये तुमच्या सूचनांना महत्त्व मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगली संधी मिळू शकते.
आर्थिक स्थिती: लाभदायक.
आरोग्य: ताण कमी ठेवा.
उपाय: विष्णू सहस्रनाम पठण करा.
शुभ रंग: हिरवा
शुभ अंक: ५

तुला राशी :
तुला राशींच्या लोकांनी आज संयम आणि संतुलन राखणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात घाई करू नका. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील.
आर्थिक स्थिती: मोठी गुंतवणूक टाळा.
आरोग्य: पाठदुखीची शक्यता.
उपाय: देवीला गुलाबी फुले अर्पण करा.
शुभ रंग: गुलाबी
शुभ अंक: ६

वृश्चिक राशी : 
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात प्रगतीची चिन्हे आहेत. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. एखादा जुना मित्र भेटू शकतो.
आर्थिक स्थिती: धनलाभाचा योग.
आरोग्य: रक्तदाब तपासा.
उपाय: मंगळवारी लाल वस्त्र दान करा.
शुभ रंग: लाल
शुभ अंक: ९

धनु राशी :
धुणे राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येईल. करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभाग मिळेल.
आर्थिक स्थिती: समाधानकारक.
आरोग्य: उत्तम.
उपाय: गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा.
शुभ रंग: पिवळा
शुभ अंक: ३

मकर राशी :  
मकर राशींच्या लोकांना कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. वरिष्ठांचा विश्वास जिंकाल. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील पण तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल.
आर्थिक स्थिती: हळूहळू सुधारणा.
आरोग्य: सांधेदुखीची काळजी घ्या.
उपाय: शनिवारी काळे तीळ दान करा.
शुभ रंग: निळा
शुभ अंक: ८

कुंभ राशी : 
कुंभ राशींच्या लोकांना सर्जनशील कामात यश मिळेल. नवीन कल्पना फायदेशीर ठरतील. मित्रांकडून मदत मिळेल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते.
आर्थिक स्थिती: अचानक लाभ संभवतो.
आरोग्य: झोप पूर्ण घ्या.
उपाय: गरजू व्यक्तींना अन्नदान करा.
शुभ रंग: जांभळा
शुभ अंक: ८

मीन राशी :
मीन राशींच्या लोकांनी भावनिक संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. कामात एकाग्रता ठेवल्यास यश मिळेल. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.
आर्थिक स्थिती: खर्च वाढू शकतो.
आरोग्य: पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात करा.
उपाय: विष्णू मंत्र जपा.
शुभ रंग: पिवळा
शुभ अंक: ७

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---