जळगाव पोलिसांची अवैध वाळूविरोधात कारवाई; ९० वर वाहने ‘रडार’वर

---Advertisement---

 

जळगाव : विनापरवाना वाळूच्या चोरट्या वाहतुकीविरोधात जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) व्यापक कारवाई केली. वाहने कलम २०७ मधील अधिकारांचा वापर करून जागेवरच जप्त करून पोलीस ठाण्याच्या ताब्यात जमा करण्यात आली. अवैध वाळू वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकाच वेळी कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेत जळगाव उपअधिक्षक नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी कार्यवाहीचे नेतृत्व केले.

या मोहिमेत जळगाव उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, एलसीबीचे अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला. तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बांभोरी, टाकरखेडे, खेडी व लगतच्या परिसरामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करून ती ताब्यात घेतली. जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत ३२ ट्रॅक्टर आणि ८ डंपर (एकूण ४० वाहने), कासोदा पोलीस ठाण्यांतर्गत १५ ट्रॅक्टर, भडगाव १३ ट्रॅक्टर, एक डंपर, एरंडोल चार ट्रॅक्टर आणि एक डंपर, मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीत १५ ट्रॅक्टर आणि एक वाळूने भरलेला ट्रॅक्टर मिळून आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---