करवाढ टाळत पाचोरा नगरपरिषदेचे 210.32 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

---Advertisement---

 

पाचोरा नगरपरिषदेकडून आर्थिक वर्ष 2026–27 साठी कोणतीही करवाढ न करता अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत 210.32 कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मांडण्यात आले. यामध्ये सुमारे आठ लाख रुपयांचा शिल्लक निधी दर्शविण्यात आला असून सभेने त्यास मंजुरी दिली.

नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ साधण्यासाठी तसेच अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. खर्चात काटकसर करून आर्थिक शिस्त राखण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नगरपालिका स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनेही काही धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत.

शहराच्या विकासासाठी राज्यस्तरीय नगरोत्थान महाअभियानांतर्गत रस्ते प्रकल्प आणि भुयारी गटार योजना राबविण्याचे नियोजन आहे. तसेच अमृत 2.0 प्रकल्पाचाही आगामी आर्थिक वर्षात समावेश करण्यात येणार आहे. या सर्व विकासकामांसाठी नियोजनबद्ध तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनिता किशोरआप्पा पाटील होत्या. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखाधिकारी अमोल कुमावत यांनी अंदाजपत्रकाचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेते सुमीत किशोरआप्पा पाटील, भाजप गटनेते सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, प्रवीण ब्राह्मणे, रेहमान तडवी, प्रियंका पाटील, मीनाक्षी एरंडे तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---