---Advertisement---
मुंबई : रमझान दरम्यान शहरातील विमानतळाजवळील आता पाडण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडच्या जागेवर नमाज पठन करू इच्छिणाऱ्या टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा चालकांना कोणताही दिलासा देण्यास नकार देताना, सुरक्षा धर्मापेक्षा जास्त महत्त्वाची आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले.
रमझान हा इस्लामचा अविभाज्य भाग असला तरी, त्याचे अनुयायी पवित्र महिन्यात कोणत्याही ठिकाणी विशेषतः सुरक्षेची चिंता जास्त असलेल्या विमानतळाच्या परिसरात नमाज अदा करण्याचा धार्मिक अधिकार असल्याचा दावा करू शकत नाहीत, असे न्या. बी. पी. कोलाबावाला आणि न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने नमूद केले.
सावधगिरी वाऱ्यावर सोडता येणार नाही, असे न्यायालयाने विमानतळ सुरक्षेच्या पैलूंवर वारंवार भर देताना सांगितले. न्यायालयात टॅक्सी-रिक्षा ओला-उबर मेन्स युनियनने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील प्रार्थना केली जायची, ते एक तात्पुरते शेड मागील वर्षी अधिकाऱ्यांनी पाडले, असा दावा याचिकेत करण्यात आला.









