सुझलॉन कंपनीची कॉपर केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; सहा जणांना अटक, निजामपूर पोलिसांची कारवाई

---Advertisement---

 

निजामपुर पोलीस ठाणे हद्दीतील फोफादे गावाच्या शिवारात वीज प्रकल्पातील कॉपर केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करून सुमारे ५ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास Suzlon Global Services Pvt. Ltd. कंपनीच्या टॉवर क्रमांक J-31 मधील २४० स्क्वेअर एमएम क्षमतेची सुमारे ३६० मीटर लांबीची कॉपर केबल चोरीस गेली. या केबलची किंमत अंदाजे ३ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या घटनेप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा माग काढला. त्यानंतर फैजान रज्जाक खाटीक (रा. जैताणे, ता. साक्री), सुकदेव आनंदा कोळी (रा. रनाळे, ता. नंदुरबार), अल्तमश शौकत सय्यद (रा. निजामपूर, ता. साक्री), दीपक पंडित सोनवणे, पावबा राजू भिल आणि करण राजू मोरे (तिघेही रा. दुसाणे, ता. साक्री, जि. धुळे) या सहा आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींकडून चोरी करताना वापरलेली ईको कार (क्रमांक GJ-05-RJ-9727) तसेच चोरीची कॉपर केबल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५ लाख ४७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई श्रीकांत धिवरे, डॉ. अजय देवरे आणि संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मयूर भामरे, प्रियदर्शनी थोरात यांच्यासह निजामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---