---Advertisement---
जळगाव जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर रखडलेल्या काही नियुक्त्यांना अखेर गती मिळाली आहे. अनुकंपा योजनेअंतर्गत नोकरीसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या 216 जणांपैकी 21 उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात आली असून त्यांना सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या माहितीनुसार, निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन केले जाईल आणि त्यानंतर त्यांच्या नियुक्तीच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत. या प्रक्रियेत टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तीन अनुकंपाधारक उमेदवारांना शिक्षक पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, अनुकंपा तत्त्वावर नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक कुटुंबांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने नियुक्तीची पुढील कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती दिली आहे.









