पंजाबमध्ये इसिस मॉड्यूलचा भंडाफोड, दोघांना अटक, शस्त्रसाठा जप्त

---Advertisement---

 

अमृतसर : पंजाब पोलिसांनी अमृतसर ग्रामीण भागात इसिस पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड करीत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक एके-४७रायफलसह दारूगोळा जप्त केला. महावीर उर्फ काका आणि मनप्रीत उर्फ मणी अशी आरोपींची नावे आहेत.

दोन्ही आरोपी समाज माध्यमावरून परदेशी हँडलर्सच्या संपर्कात होते. हे मॉड्यूल कट्टरतावाद पसरवणे तसेच भारतविरोधी आणि पोलिसविरोधी कथानक प्रसारित करण्यात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. या कारवाईदरम्यान त्यांच्याकडून एक ९ एमएम ग्लॉक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

प्राथमिक तपासात आरोपी परदेशातील गोपी नवशेहरिया आणि जस्सी कुलम यांच्या सूचनेवरून काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपींनी परदेशी हँडलरच्या सूचनेवरून आयईडी आणि हँडग्रेनेड खरेदी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---