कर्तव्यदक्षतेची उब… क्षुधाशांतीला वेळेवर मिळाला जीवनदायी गॅस, डॉ. भरत अमळकर यांची दक्षता अन् प्रशासनाच्या सतर्कतेची अनुभूती

---Advertisement---

 

जळगाव : समाजातील गरजुंना अल्प दरात पौष्टिक व दर्जेदार भोजन अल्प दरात देणाऱ्या केशव स्मृती समुहातील क्षुधाशांती सेवा शनिवारी दुपारी अचानक एक अडथळा निर्माण झाला. गॅस सिलेंडर टंचाईमुळे या ठिकाणी केवळ शिल्लक होते. गरजुंच्या पोटाशी जोडलेली ही सेवा थांबू नये म्हणून पदाधिकाऱ्यांनी केशव स्मृती सेवा समुहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर यांच्याशी संपर्क साधला व तेथुन चक्रे फिरताच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मदतीचा हात दिल्यामुळे मोठे संकट टळले.

‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ जाणिजे यज्ञकर्म’ ही संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळ. केवळ पोट भरण्यासाठी केलेले काम हे साधे उपजीविकेचे साधन असते; पण ते काम जर प्रामाणिकपणे, समाजहितासाठी आणि कर्तव्यभावनेने केले तर ते ‘यज्ञकर्म’ म्हणजेच पवित्र कार्य असते. क्षुधाशांतीच्या माध्यमातून होत असलेले काम हे प्रामाणिकपणाला कर्तव्याची जोड ठरते आहे, हे काम यज्ञासारखेच होय. आणि याच ठिकाणी गॅस सिलेंडर टंचाईचा फटका बसला.

आणि चक्रे फिरली

गॅस सिलेंडर टंचाईची माहिती प्रकल्पातील संजय याज्ञिक यांनी सेवा समुहाचे अध्यक्ष डॉ. भरतदादा अमळकर यांच्या कानावर घातली. क्षुधाशांतीमध्ये रोज सुमारे १५०० नागरिक जेवण करत असतात. कधी हा आकडा जास्तही असतो. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होणार होती. डॉ. अमळकर यांनी तात्काळ प्रशासनास पत्र देण्याचा सल्ला देऊन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी संवाद साधला. प्रशासनानेही विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन फिरवली. जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी तातडीने संस्थेशी संपर्क साधुन क्षुधाशांती केंद्राची माहिती घेतली. समाजासाठी चालणारा हा सेवा प्रकल्प लक्षात घेऊन त्यांनी लगेचच गॅस एजन्सीला पत्र दिले तसेच अत्यावश्यक सेवा कोट्यातून त्वरित सिलेंडर पुरविण्याचे आदेश दिले.

‘ही सेवा गरजुंना अन्न देणारी आहे, येथे सिलेंडरची कमतरता होऊ देऊ नका’ असे स्पष्ट निर्देशही दिले. प्रशासनाच्या तत्परतेचा परिणाम असा झाला की अवघ्या दोन तासात क्षुधाशांती केंद्रात सिलेंडर पोहोचले. पुढील कोटाही त्वरित उपलब्ध करून देण्यात आला आणि थांबण्याच्या उंबरठ्यावर आलेली ही सेवा पुन्हा पुर्ववत सुरू झाली. गरजुंच्या पोटाशी जोडलेली ही सेवा अखंड सुरू रहावी यासाठी प्रशासनाने दाखविलेली संवेदनशीलता आणि कर्तदक्षता पाहून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह लाभार्थ्यांच्या चेहेऱ्यावर दिलासा आणि कृतज्ञतेची भावना उमटली. खऱ्या अर्थाने समाजाच्या गरजा ओळखून तात्काळ निर्णय घेणारे, मानवी संवेदना जपणारे जिल्हाधिकारी लाभणे हे या जिल्ह्याचे भाग्यच अशा भावना या निमित्ताने उमटत आहेत. प्रशासनाच्या या संवेदनशील हस्तक्षेपामुळे अनेक गरजूंना मिळणाऱ्या अन्नसेवेचा दिवा पुन्हा तेजाने पेटत रहाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---