धरणगाव नगरपरिषदेकडून कर थकबाकीदारांना ३१ मार्चचा अल्टिमेटम, एप्रिलपासून २४% पर्यंत बसणार दंड

---Advertisement---

 

धरणगाव नगरपरिषद प्रशासनाने थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसूल करण्यासाठी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरभर विशेष मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २० पाणी नळ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत, तर सुमारे २५० मोठ्या थकबाकीदारांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. या कारवाईमुळे कर न भरणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या विविध पथकांनी शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन वसुलीचे काम वेगाने सुरू केले आहे. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्यांवर आता थेट कारवाई केली जात आहे. तसेच, आणखी २०० नागरिकांना अंतिम जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली असून, ठराविक मुदतीत कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

या मोहिमेत कार्यालय अधीक्षक भिकन पारधी, कर निरीक्षक व अस्थापना प्रमुख मंगेश लंके, पाणीपुरवठा अभियंता धनंजय कोठुळे, उद्यान पर्यवेक्षक शाहू पाटील यांच्यासह वसुली विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. संबंधित पथके समन्वयाने काम करत असून शहरातील थकबाकी कमी करण्यावर भर दिला जात आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी सांगितले की, नागरिकांनी वेळेत कर भरणे ही आपली जबाबदारी आहे. कारवाई टाळायची असेल तर त्वरित थकबाकी भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, १ एप्रिल २०२६ पासून संगणकीय कर प्रणाली लागू होणार असून थकबाकीवर दरमहा २ टक्के दंडात्मक व्याज आकारले जाईल. त्यामुळे वर्षभरात सुमारे २४ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर पडू शकतो. त्यामुळे अनावश्यक दंड आणि पुढील कारवाई टाळण्यासाठी कर वेळेत भरण्याचे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---