बंद घरातून दीड लाखाचा मुद्देमाल लंपास, सत्यम पार्क परिसरात धास्तावले नागरिक

---Advertisement---

 

Jalgaon News : निमखेडी शिवारात कुलुपबंद घर फोडल्याच्या घटने पाठोपाठ आव्हाणे शिवारात सत्यम पार्कमध्ये कुलुपबंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत दीड लाखाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याचे दिसुन आले.

सागर राजेंद्र जगताप (वय ३२,रा.१६/२ सत्यम पार्क) या ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते पान दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी (२० मार्च) दुपारी एक वाजेच्या सुमारास घराला कुलुप लावुन जगताप हे कामानिमित्त गेले. त्यानंतर चोरट्यांनी या बंद घराला लक्ष्य केले. मुख्य दरवाजाला लावलेले कुलुप तोडत घरात संशयितांनी प्रवेश केला. सामान अस्तव्यस्त करत किमती मुद्देमालाचा शोध घेतला. कपाटातील सामान इतरत्र फेकला. शनिवारी (२१ मार्च) सकाळी सात वाजता सागर जगताप घरी आले असता त्यांना दरवाज्याचे कुलुप तुटलेले दिसले. आत गेले असता घरात सामान सर्वत्र विखुरलेला आढळुन आला. मौल्यवान वस्तु व रोकड गायब झाल्याचे त्यांना दिसुन आले. त्यांनी ही माहिती तालुका पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे तपास करीत आहेत.

दागिने – रोकड नेली

३२ हजार किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची चैन, तीन हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाची बदाम आकाराचे सोन्याचे पॅन्डल, १२ हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे चार सोन्याचे मणी तसेच तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वाट्या असलेले मंगळसुत्र, दहा हजाराची रोकड असा सुमारे एक लाख ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेत चोरटे फरार झाले.

मयुर सोसायटीत तोडला कडीकोंडा

या घरफोडीआधी निमखेडी शिवारातील मुयर हौसिंग सोसायटीत बंद घराला चोरट्यानी लक्ष्य केले होते. या बंद दरवाजाचा कडीकोंडा तोडुन चोरट्यांनी घरात एन्ट्री केली. त्यानंतर घरातील तांबे पितळी भांडे, आठ हजाराची रोकड असा सुमारे १४ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेला. याप्रकरणी भास्कर सुदाम चौधरी यांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (२० मार्च) तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---