---Advertisement---
नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजे आणि टँकरला कोणताही धोका नाही. त्यामुळे भारताने होर्मुझच्या सुरक्षेसंदर्भात चिंता करू नये. भारत आमचा मित्र राष्ट्र आहे आणि त्यांच्या जहाजांनी सुरक्षित मार्ग उपलब्ध करणे आमची जबाबदारी आहे. भारतीय ध्वज असलेली जहाजे आणि खलाशी सुरक्षित असून, एलपीजी आणि तेलाचा पुरवठा अविरत सुरू राहील, अशी माहिती भारतातील इराणचे राजदूत डॉ. मोहम्मद फताली यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
भारताने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थितीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. भारतीय जहाजे आणि टँकरच्या सुरक्षेची जबाबदारी इराणी फौजांची आहे. त्यामुळे होर्मुझ जलमार्ग संदर्भात भारताने चिंता करू नये असे फताली म्हणाले. आमचे भारतीय मित्र सुरक्षित आहेत आणि त्यांच्याबद्दल कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. सध्या शेकडो भारतीय नागरिक इराण आणि पर्शियन आखातात आहे, त्यांनी कोणतीही हानी पोहचणार नाही याची इराण खात्री देतो.
होर्मुझच्या सामुद्रधुनीचे भवितव्य केवळ इराण आणि ओमानच ठरवतील. अमेरिकेला मदत करणारे शत्रू राष्ट्रांची जहाजे आणि टँकर आमचे लक्ष्य आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या जहाजांना या मार्गातून जाऊ देणार नाही. आम्ही पंतप्रधान मोदी यांना जहाजांच्या सुरक्षेची हमी दिली आहे.
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर अमेरिका-इस्रायलच्या सैन्याने
गुरुवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानसह आठ शहरांतील पायाभूत सुविधांना लक्ष्य करीत जोरदार हल्ले चढविले. याला प्रत्युत्तर देत आयआरजीसीने इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि इतर शहरांवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा केला. सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकेच्या लष्करी व हवाई तळांवर हल्ले चढविले. यात झालेल्या नुकसानीचा तपशील समोर आलेला नाही.
अमेरिकेने इराणध्ये प्रवेशाची चूक करू नये
इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्म्सच्या अर्थात् आयआरजीसीचे प्रवक्ते इब्राहिम झोल्फघारी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, अमेरिकेने इराणमध्ये प्रवेश करण्याची चूक करू नये, अन्यथा त्यांना याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे सैन्य हल्लेखोरांचे पाय तोडल्याशिवाय राहणार नाही. इराण कोणत्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. अमेरिकेने जमिनीवरून कारवाई केल्यास रशियन चेचेन तुकड्या इराणमध्ये तैनात होण्यास सज्ज आहेत.









