‘अजित पवार मेला तरी फरक पडत नाही’; किशोर मासाळ यांच्या व्हायरल ऑडिओवरून खळबळ, सुप्रिया सुळेंची तीव्र प्रतिक्रिया….

---Advertisement---

 

राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नगरसेवक किशोर मासाळ यांच्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हायरल ऑडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये किशोर मासाळ एका महिलेशी संवाद साधताना कथितपणे अजित पवार आणि रुपाली पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरत असल्याचे ऐकू येत आहे. या क्लिपमुळे राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.

प्रकरण गाजल्यानंतर किशोर मासाळ यांनी सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये आपण अजित पवार यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले असून त्याबद्दल त्यांना पश्चाताप होत आहे. तसेच अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांची आणि बारामतीकरांची माफी मागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा “एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत”; ‘देवेंद्र फडणवीसांना बढती मिळावी’, बच्चू कडूंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण…

याचबरोबर आपल्या वक्तव्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून अजित पवार यांच्या अपघातस्थळी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. “हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, गलिच्छ आणि खालच्या पातळीचे आहे. अशा प्रकारची भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही,” असे त्या म्हणाल्या.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. “क्लिप खरी आहे की नाही, याची चौकशी झाली पाहिजे. मात्र ती खरी असल्यास कोणत्याही कार्यकर्त्याने नेत्यांविषयी अशा प्रकारची अपमानास्पद भाषा वापरणे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---