अंधश्रद्धेचा क्रूर प्रकार! तांत्रिकाच्या सांगण्यावरून आईनेच दिला १३ वर्षीय मुलीचा बळी; मुलाला वाचवण्यासाठी आईचा थरारक निर्णय…!

---Advertisement---

 

आई-मुलांचं नात हे प्रेमळ असत अगदी मुलांसाठी काहीही करण्याची तिची तयारी असते आणि याच उदाहरण फक्त आईच असते. मात्र मातृत्वाला लाज आणणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकारात एका आईने आपला मुलगा आजारातून चांगला व्हावा म्हणून पोटच्या मुलीला एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून निरागस मुलीचा बळी दिला आहे.

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आजारी मुलाला बरे करण्याच्या हेतूने एका आईने तांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वतःच्या १३ वर्षीय मुलीचा बळी दिल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना हजारीबाग जिल्ह्यात कुसुंभा गावात घडली. आरोपी आई आपल्या मुलाच्या आजारामुळे चिंतेत होती. याच दरम्यान तिचा संपर्क एका तथाकथित तांत्रिकाशी आला. संबंधित तांत्रिकाने एका कुमारी मुलीचा बळी दिल्यास तुझा मुलगा बरा होईल, असा विश्वास तिला दिला. या अंधविश्वासाला बळी पडत आईनेच आपल्या मुलीविरुद्ध कट रचल्याचे तपासात समोर आले.

सदर घटना ही चैत्र नवरात्रीच्या काळात घडल्याची माहिती असून, गावात सणाचे वातावरण असताना हा प्रकार घडला. मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आणि त्यानंतर मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सुरुवातीला आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे अपहरण झाल्याची खोटी माहिती देण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान आणि वैद्यकीय अहवालानंतर प्रकरणाचा खरा तपशील समोर आला.

पोलिसांनी या प्रकरणी संबंधित आई, तांत्रिक आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली घडणाऱ्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत न्यायालयानेही संबंधित यंत्रणांकडून अहवाल मागवला असल्याची माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---