“कोरिडोरमुळे जनतेच्या घरांवर गदा; “सरकारी जागा मात्र पडून, पंढरपूरात अभयसिंह इचगांवकरांची भव्य रॅली”

---Advertisement---

 

(पंढरपूर अभिजित अवताडे: पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने आज (बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६) कोरिडोर प्रकल्पाच्या विरोधात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. “स्वतःच्या शेकडो एकर सरकारी जागा वर्षानुवर्षे पडून ठेवून, विकासाच्या नावाखाली नागरिकांची घरे पाडण्याचा सरकारला नैतिक अधिकार आहे का?” असा जळजळीत सवाल समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगांवकर यांनी उपस्थित करत आंदोलनाची धार अधिक तीव्र केली.


या रॅलीचा मुख्य उद्देश पंढरपूरातील विविध शासकीय व निमशासकीय पडीक जागांची “शोधयात्रा” काढून त्यांची वास्तवस्थिती जनतेसमोर आणणे हा होता. रॅलीदरम्यान खादी ग्रामोद्योग, लोटेवाडी म्हसोबा परिसर, फटाका स्टॉल, जिजामाता उद्यान, टिळक स्मारक, जुने कोर्ट, हनुमान मैदान, नगरपालिका दवाखाना, जुनी नगरपरिषद इमारत, लोकमान्य हायस्कूलची जुनी इमारत, लिमयेवाडा, सातमजली दर्शन मंडप, सीपीडब्लू डी इमारत, स्मशानाजवळील प्रस्तावित दर्शन मंडप, प्रधानमंत्री आवास योजना जागा, गजानन महाराज पिछाडी पार्किंग, गाडगेमहाराज चौकातील मोकळ्या जागा, यमाई तलाव व तेथील भव्य पार्किंग, MTDC भक्तनिवास, ब्लड बँकजवळील मोकळी जागा, पद्मावती उद्यान तसेच ओपन लॉन आदी ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात आली.

या सर्व जागांचा सविस्तर अहवाल तयार करून प्रांत कार्यालयाच्या शिरस्तेदारांकडे सादर करण्यात आला. या जागांचा योग्य नियोजन करून विकास साधावा, असा पर्यायी आराखडा वारकरी संप्रदाय पाईक संघ, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि संतभूमी बचाव समितीच्या वतीने यापूर्वीच शासनाला दिल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

या आंदोलनात सुमारे ५०० हून अधिक मोटारसायकली आणि १००० पेक्षा जास्त नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. समितीचे पदाधिकारी ह.भ.प. माउली महाराज गुरव, ह.भ.प. वडगावकर महाराज, बाबाराव महाजनबडवे, वैभव बडवे, व्यंकटेश कुलकर्णी, अनिल गवळी, गणेश लंके, जव्हेरी, येवनकर, उंडाळे आदींसह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला आघाडीचाही लक्षणीय सहभाग होता. सौ. बडवे, डॉ. बेणारे, सौ. वट्टमवार, सौ. लंके, सौ. आगरवाल यांनी नेतृत्व करत महिलांनीही आपली भूमिका ठामपणे मांडली.

दरम्यान, अनेक पंढरपूरकरांना शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासकीय जागा मोकळ्या आहेत, याची माहितीच नव्हती. त्यामुळे या अभिनव आंदोलनाचे नागरिकांमधून कौतुक होत असून, “विकासाचा पर्याय असताना घरांवर गदा का?” हा प्रश्न अधिक तीव्रतेने पुढे येत आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक बेणारे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---