---Advertisement---
आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदी दरात घसरण झाली होती. मात्र आता युद्ध थांबल्यानंतर जागतिक बाजारात मोठी उसळी दिसून येत आहे. या घडामोडींचा परिणाम जळगावच्या सुवर्णपेठेवरही होताना दिसत आहे.
जळगाव सराफ बाजारात काल गुरुवारी सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण झाली होती. मात्र आज शुक्रवारी सराफा बाजार उघडताच जळगाव बाजारपेठांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली.
जाणून घ्या आजचा भाव?
जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल १ हजार रुपयांची वाढ होऊन दर १,५५,०१५ रुपये इतका झाला आहे. तर चांदीच्या दरातही प्रति किलो ५ हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचा भाव प्रति किलो २,५२,३५० रुपये इतका झाला आहे.
दरम्यान, लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात झालेली वाढ ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकत असून, खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिस्थिती स्थिर राहिली नाही तर सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.









