---Advertisement---
Nandurbar News : नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत तळोदा रोडवरी हॉटेल मंदाकिनीत काम करणारा सागर रमेश जाधव (कैकाडी), वय २५ वर्षे, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार हा रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये काम करीत असतांना उदयसिंग ऊर्फ विक्की राजुसिंग राजपुत, साईबाबा मंदिराजवळ, परदेशीपुरा, नंदुरबार, कैलास रमेश पाडवी, रा.वाघोदा, ता.जि. नंदुरबार, निलेश ऊर्फ बंटी वसंत चौधरी, रा. कोहिनुर टाकी जवळ, नंदुरबार, दशरथ हिरालाल मुसळदे, रा. पातोंडा, ता. जि. नंदुरबार व एक फरार इसम अशांनी कामगार सागर जाधव यास शिवीगाळ करत ‘आमचा मित्र जय वळवीच्या खुनाच्या गुन्हयात तुझा मालक जेल मध्ये असतांना तु हॉटेल चालू ठेवण्याची हिम्मत का केली, तुझा हॉटेल चालु ठेवण्याचा काय संबंध’ असे बोलून लाकडी दांडक्याने गंभीर दुखापत केली. यात सागरचा मृत्यू झाला. यावरून चारही संशयीतांवर उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्हयाचा समांतर तपास सुरू होता.
या गुन्हयातील आरोपी हे पातोंडा ता.जि. नंदुरबार येथील एका शिवारातील जुन्या पडक्या बिल्डींगमध्ये लपले असल्याची माहिती असतांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. या आधारे हेमंत पाटील यांनी स्था.गु.शा. पथकास आरोपींचा शोध घेत संशयीत आरोपींना सापळा रचुन पकडले व त्यांना विश्वासात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानुसार संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ताब्यात घेत उपनगर पोलीस ठाण्याचे स्वाधीन केले.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि विकास गुंजाळ, असई. राकेश वसावे, पोहेकॉ. दिनेश चित्ते, मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, मनोज नाईक, अजित गावीत, मोहन ढमढेरे, पोना. चेतन साळवे, पोकॉ. अभय राजपुत, आनंदा मराठे यांनी केली आहे.
- जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कुठल्याही घटनेबाबतची योग्य माहिती घेऊन सोशल मिडीयावर जबाबदारीने व्यक्त व्हावे, तसेच आपल्या कृती/पोस्टमुळे दोन समाजात किंवा जाती जातीत तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल अशी कोणतीही अनूचित पोस्ट/व्हिडिओ वायरल करु नये.’
श्रवण दत्त.एस, पोलीस अधीक्षक, नंदुरबार









