नवऱ्याने बायकोला हनिमूनच्या रात्री अनोळखी 5 पुरुषांकडे सोपवलं…, विवाहितेसोबत घडली अंगावर काटा आणणारी घटना…

---Advertisement---

 

नवऱ्याने बायकोला हनिमूनच्या रात्री पाच पुरुषांकडे सोपवलं…., अशी धक्कादायक घटना 22 वर्षीय विवाहित तरुण सोबत घडली आहे. अत्यंत धक्कादायक घटना असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

लग्नानंतरच सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीची स्वप्नांची राख रांगोळी झाल्याची ही घटना आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने बायकोला दुसऱ्या 5 पुरुषांच्या हवाले केलं आणि नशेत असलेल्या या परक्या पाच पुरुषांनी व तिच्या नवऱ्याने पिडीतेवर अत्याचार केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आहे तेलंगणाच्या राजधानी हैदराबाद इथली. राष्ट्रीय महिला आयोगाने या धक्कादायक घटनेचे स्वतःहून दखल घेतली असून पोलिसांकडून याबाबतचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या संपूर्ण घटनेने स्थानिक पोलीस प्रशासनाचा ही मोठी खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 वर्षीय पीडित महिलेने तक्रार दाखल केली ज्यात महिलेने नमूद केला आहे. की ही घटना तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्री घडली आहे. विवाहित महिलेने केलेल्या आरोपानुसार, 28 जुलै 2025 मध्ये आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात राहणाऱ्या 28 वर्षीय व्यक्तीसोबत तिचं सब रजिस्ट्रार कार्यालयात लग्न झालं होतं. लग्नानंतर ही पिडीत विवाहित महिला नवऱ्यासोबत भाडेकरू म्हणून राहू लागली. त्यांचं लग्न झालं त्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवऱ्याने त्याच्या पाच अनोळखी मित्रांना घरी बोलावून दारू पार्टी केली त्यांना दारू पाजली, सदर पीडित विवाहित महिलेलाही जबरदस्ती दारू पाजली. मात्र ती नशेत असताना बेशुद्ध झाली तेव्हा तिच्या नवऱ्यासोबत इतर त्या पाच पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला असा महिलेचा गंभीर आरोप आहे.

या अत्याचाराचा बेगम पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेतील सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पीडित विवाहित महिलेने यापूर्वीही कूकटपल्ली येथे तिच्या विधवा आई व बहिणी सोबत राहत होती. या प्रकरणाची गंभीर्यता लक्षात घेऊन संपूर्ण सखोल तपास केला जाईल आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तेलंगणाचे पोलीस महासंचालक यांना याप्रकरणी तात्काळ स्वरूपाची चौकशी करायला सांगितली असून सर्व आरोपींना अटक करून त्यांच्या सर्व तपासण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. याशिवाय पीडित विवाहीतेच्या संरक्षणाची पूर्ण खबरदारी घेण्याचे देखील आदेश देण्याचे सांगितलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---