आधी शारीरिक अत्याचार, मग चार्जरने गळा दाबून अधिकाऱ्याच्या २१ मुलीची हत्या

---Advertisement---

 

नवी दिल्ली : दिल्ली मधील अमर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका आयआरएस अधिकाऱ्याच्या २१ वर्षीय मुलीवर अत्याचार करून मोबाईल चार्जरने गळा दाबून तिची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल.

मृत मुलीचे वडील १९९७ च्या बॅचचे आयआरएस कस्टम अधिकारी आहेत. मुलीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून ती सध्या यूपीएससीची तयारी करत होती. सकाळी तिचे आई-वडील जिममध्ये गेले असताना मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचा रहिवासी असलेला आणि महिनाभरापूर्वी काही कारणास्तव नोकरीवरून काढून टाकण्यात आलेला राकेश मीना नावाच्या नोकराचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

अत्याचारावेळी मुलीने प्रतिकार केल्यामुळे तिची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक पथके सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---