जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश….

---Advertisement---

 

मुंबई येथे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात डॉ. मनोहर पाटील आणि विश्वजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, रावेर लोकसभेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत काते, जिल्हा प्रमुख समाधान महाजन तसेच शिवसेना तालुका प्रमुख अ‍ॅड. भरत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व नेत्यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जामनेर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---