---Advertisement---
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. BPCL ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून या प्रक्रियेद्वारे एकूण 250 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भरतीमध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्हची 210 पदे, सेक्रेटरीची 8 पदे आणि असोसिएट एक्झिक्युटिव्हची 32 पदे भरण्यात येणार आहेत.
पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, इंजिनियर पदासाठी संबंधित शाखेतील डिप्लोमा आणि किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
अकाउंट्स पदासाठी इंटर CA किंवा CMA सोबत पदवी आवश्यक आहे. सेक्रेटरी पदासाठी 10वी, 12वी उत्तीर्ण आणि पदवी आवश्यक असून, असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी M.Sc. पदवी आवश्यक आहे.
अर्ज करताना जनरल, ओबीसी, एनसीएल आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन देण्यात येणार आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरी पदासाठी 30 हजार ते 1 लाख 20 हजार रुपये, तर असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी 40 हजार ते 1 लाख 40 हजार रुपये इतका पगार मिळणार आहे. सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.









