फेसर्डी नंदगाव येथील सांडपाणी आणि कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास कचरा थेट ‘बीडीओ’च्या दालनात टाकणार!

---Advertisement---

 

फेसर्डी-नंदगाव येथे गटाराच्या सांडपाण्याची व कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गावातील मुख्य रस्त्यावर नालीची व्यवस्था नसल्यामुळे गटाराचे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात आहे. त्यामुळे पायी चालणारे नागरिक तसेच वाहनचालकांना दररोज घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
याशिवाय, सार्वजनिक मुतारीच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रदीप राजेंद्र पाटील यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “येत्या ८ दिवसांत सांडपाणी व कचऱ्याची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा तोच कचरा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात टाकण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच, ठराविक मुदतीत समस्या न सुटल्यास गावातील नागरिकांसह पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. हा प्रश्न जनतेच्या आरोग्याशी संबंधित असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---