---Advertisement---
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) विरुद्ध एक मोठे पाऊल उचलले आहे. बँकेचा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे, बँक कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही किंवा क्रेडिट व्यवहार करू शकणार नाही.
या निर्णयाचा थेट परिणाम बँकेच्या लाखो ग्राहकांवर होणार आहे. रिझर्व्ह बँकेने बँकेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरबीआयने म्हटले आहे की, बँकेच्या व्यवस्थापनाची सर्वसाधारण पद्धत ठेवीदारांच्या तसेच सार्वजनिक हिताच्या विरोधात आहे.
परिणामी, पेटीएम पेमेंटर स बँकेला कोणताही बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. आरबीआयने असेही म्हटले की, बँक बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला जाईल. आरबीआयने आदेशात म्हटले की, बँक बंद झाल्यावर पेटीएम पेमेंटरस बँक लिमिटेडकडे तिची संपूर्ण ठेव देयता परतफेड करण्यासाठी पुरेशी तरलता आहे. पेटीएम पेमेंटर स बँकेला ११ मार्च २०२२ पासून नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.









