अवैध दारू वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..! 28 लाख 87 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…

---Advertisement---

 

नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांना दि. 24 एप्रिल रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहन क्र. MH 14 GD 7497 हिच्यात अवैधरित्या विदेशी दारु भरुन तिची शहादा मार्गे गुजरात राज्यात चोरटी वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळालेवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.

मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शहादा शहरातील शिरुड चौफूली जवळ शहादा-प्रकाशा रोडाच्या कडेला दबा धरुन बसले असता सकाळी 05.30 वाजेचे सुमारास शहादा शहरातुन प्रकाशाकडे एक पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन येतांना दिसले त्यास पथकाने हात देऊन थांबविले. सदर वाहनाचा क्रमांक MH 14 GD 7497 असा असुन त्यावरील वाहनचालकास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव देवेंद्र खुमाराम मेघवाल, वय 26 वर्षे, रा. रुपवास धोडीवाडी बास ढाणी सोजत ता. सोजत, जि. पाली राजस्थान असे सांगितले. त्यास वाहनात काय आहे बाबत विचारणा करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याचेवर पथकास अधिकचा संशय बळावल्याने त्याचे वाहनाची तपासणी करता त्याचेकडून एकुण 28 लाख 87 हजार 360 रुपये किमतीचा अवैध दारुचा (217 खोके) वाहनासह असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. त्याअन्वये आरोपीविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक  आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेकॉ/मोहन ढमढेरे, पोना/विकास कापुरे, पोकॉ/शोएब शेख, भरत उगले, सतिश घुले अशांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---