अशोक खरात ने हवेतून काढली काजू कतली : स्वतःच्या सीएलाच घातला कोट्यवधींचा गंडा ; अखेर त्याचा गेम कसा झाला? वाचा इनसाईड स्टोरी…

---Advertisement---

 

नाशिक :भोंदू अशोक खरातने हवेतून काजू कतली काढण्याची हात चलाखी करून एका चार्टर्ड अकाउंटंटलाच गंडा घातल्याचा अजब प्रकार उजेडात आला आहे.या सीएने खरात ने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्याचा ठरवून गेम केला. विशेष म्हणजे भोंदू खरातला आपल्या विरोधात जाडे विनले जात असल्याची खबरबातही लागली नाही.
भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि भीती दाखवून नागरिकांची आर्थिक लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अशोक खरात याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी झाल्याचे समोर येत आहे.
तक्रारदार ललित पोफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात याने त्यांच्या कुटुंबाला मृत्यूचा धोका असल्याची भीती दाखवत विविध पूजाअर्चा करण्यास भाग पाडले. या माध्यमातून त्याने तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील तपासात धक्कादायक बाबी उघड झाल्या. पूजेच्या नावाखाली खरातने पोफळे यांच्याकडून सुमारे ४ कोटी २५ लाख रुपये स्वतःच्या व पत्नीच्या खात्यात जमा करून घेतले. तसेच त्र्यंबकेश्वर व वावी येथे ‘दुर्गा पूजे’च्या नावाखाली आणखी २ कोटी ५३ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.
संशय आल्याने पोफळे यांनी खास रणनीती आखत आपल्या ओळखीच्या व्यक्तीला खरातच्या फार्महाऊसवर स्वयंपाकी म्हणून ठेवले. या व्यक्तीमार्फत फार्महाऊसवरील अश्लील पार्ट्या, महिलांसोबतचे अनैतिक संबंध आणि पैशांच्या गैरव्यवहाराचे पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर पीडितांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश केला.
अशोक खरात याच्यावर यापूर्वीही लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याचे आरोप आहेत. मार्च २०२६ मध्ये त्याला अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडून सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी पीडित पुढे येण्याची शक्यता असून सखोल चौकशी केली जाणार आहे. आरोपीविरोधात नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---