---Advertisement---
जळगाव:
जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांपासून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकूण ८ वाहने जप्त करण्यात आली असून, वाळू माफियांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
दोन दिवस सलग कारवाईचा धडाका
जिल्ह्यातील अवैध खजिन संपत्तीची चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी २४ आणि २५ एप्रिल २०२६ रोजी सलग कारवाई केली. विशेष म्हणजे, २५ एप्रिल रोजी पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस स्टेशननिहाय जप्त वाहनांचा तपशील
धरणगाव, जळगाव तालुका आणि एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ट्रॅक्टर आणि डंपर यांसारख्या मोठ्या वाहनांचा समावेश आहे.
जप्त केलेल्या मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे:
अ.नं. पोलीस स्टेशन वाहनांचा प्रकार वाहनांची अंदाजे किंमत जप्त वाळूची किंमत
१ धरणगाव ०३ ट्रॅक्टर १२,००,०००/- रुपये १२,०००/- रुपये
२ जळगाव तालुका ०२ डंपर १५,००,०००/- रुपये १८,०००/- रुपये
३ एम.आय.डी.सी. ०३ डंपर २८,००,०००/- रुपये २२,०००/- रुपये
एकूण ०८ वाहने ५५,००,०००/- रुपये ४२,०००/- रुपये
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणपुरे यांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या पथकासह संयुक्त कारवाई करून ३ डंपर जप्त केले. या संपूर्ण मोहिमेत ५५ लाख रुपये किमतीची ८ वाहने आणि ४२ हजार रुपये किमतीची अवैध वाळू असा एकूण मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) श्रीमती कविता नेरकर आणि अपर पोलीस अधीक्षक (जळगाव परिमंडळ) श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली.
जिल्ह्यातील अवैध खनिज संपत्तीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची तीव्र कारवाई निरंतर सुरू राहील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









