नवापुर हद्दीत ९२ लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त, वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

---Advertisement---

 

नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखेने नवापूर हद्दीत ९२ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करीत मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून रायपुर ता. नवापुर येथील भावीन कोकणी हा त्याच्या घराच्या जवळ असलेल्या शेताला लागुन वनामध्ये अवैधरित्या दारुचा साठा साठवुन त्याची वाहनामध्ये वाहतुक करीत होता.

मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भावीन कोकणी याचे घराजवळील शेताजवळ असलेल्या लहान टेकडीच्या शेजारी झाडाझुडपातील खाचेच्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम व वाहने असे जमि नीवर ठेवलेल्या दारु सहित साहित्य दिसुन आले. इसमांना पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने ते तेथुन पळ काढत असतांना पथकाने एका इसमाला ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव धर्मेश मंगु धोडी, वय ३६ वर्षे, रा. एकलारा, जि. वलसाड, गुजरात असे सांगितले.

सदरचा माल हा भाविन कोकणी याचा असल्याचे त्याने सांगितले. ठिकाणी एकुण ४ चारचाकी वाहने मिळुन आली असून त्या वाहनांमध्ये दारुचे बॉक्स मिळुन आले. त्यात एकुण ९२ लाख ७८ हजार ४६० रुपये किमतीचा अवैध दारुचा मुद्देमाल एकुण ०४ वाहनासह जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. नमुद आरोपीविरुध्द नवापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि विकास गुंजाळ, पोहेकॉ जितेंद्र तांबोळी, जितेंद्र तोरवणे, बापु बागुल, नितीन गांगुर्डे, दिनेश चित्ते, मुकेश तावडे, मनोज नाईक, विशाल नागरे, अजित गावीत, सचिन वसावे अशांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---