शहादा शहरात कलर पेंट दुकानात भीषण आग; मोठी दुर्घटना टळली…!

---Advertisement---

 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात आग लागल्याची घटना समोर आली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पटेल रेसिडेन्सी परिसरातील ‘शिवशक्ती कलर पेंट’ या दुकानात अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच शहादा नगरपालिका अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि जलद कारवाईमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकानाचे मालक गौरव संजय पाटील (रा. गुजर गल्ली, शहादा) यांनी दुपारच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेल्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांतच दुकानातून धूर आणि ज्वाळा दिसू लागल्या.

परिसरातील नागरिक आणि दुकानदारांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

या आगीत दुकानातील काही मालमत्तेचे नुकसान झाले असून, पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. घटनेदरम्यान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या धाडसामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी अशा घटनांमुळे विद्युत सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---