---Advertisement---
जळगाव शहरात आज एक हृदयद्रावक अपघाताची घटना असून, मानराज पार्क चौफुलीवर भरधाव ट्रकने दुचाकीस्वार तरुणाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या मृत तरुणाचे नाव ओम सुनील गिरी (वय २५) असे असून, तो दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रकखाली चिरडल्याने ओमचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ओमच्या कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्याची आई आणि बहिणीचा मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
या अपघातामुळे काही काळ दुतर्फा वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी मदत करून मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.









